कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल ३६७ जणांना लागण झाली असून सहाजणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११६ जण बरे झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला तर ३३२८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील १७७, भुदरगड तालुक्यातील ९, चंदगड तालुक्यातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २९, कागल तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील २३, पन्हाळा तालुक्यातील १३, राधानगरी तालुक्यातील ८, शाहूवाडी तालुक्यातील ९, शिरोळ तालुक्यातील ५, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५७ आणि इतर जिल्ह्यातील १७ अशा ३६७ जणांना लागण झाली आहे.

कोल्हापुरातील शनिवार पेठ येथील १, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील १, पन्हाळा तालुक्यातील नावली येथील १, इचलकरंजीमधील १, सांगली जिल्ह्यातील १ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एक अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – ५४,३९५, डिस्चार्ज – ५०, ३३७, उपचारासाठी दाखल रुग्ण – २२१०, मृत्यू – १८१२.