कोरोना अपडेट : दिवसभरात २६३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब अशी की दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २६३९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ११, आजरा तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,९९२.

एकूण डिस्चार्ज : ४६,८३६.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ४८०.

एकूण मृत्यू : १६७६.