कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

0
147

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७४५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ७, गडहिंग्लज तालुक्यातील २,  हातकणंगले तालुक्यातील १,  करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,४११.

एकूण डिस्चार्ज : ४७,६२९

उपचारासाठी दाखल रुग्ण : ८४.

एकूण मृत्यू : १,६९८.