कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ८३ जणांना लागण

0
309

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र त्या प्रमाणात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाहीये. मागील चोवीस तासांत ८३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १३५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

कोल्हापूर शहरातील २५, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील १०, कागल तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ३, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १३ आणि इतर जिल्ह्यातील १५ अशा ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची रुग्णस्थिती – :

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५१, ६४०, डिस्चार्ज – ४९, १९१, उपचारासाठी दाखल रुग्ण – ६८५, मृत्यू – १७६४.