कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त, तर एकाचा मृत्यू

0
56

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २३, आजरा तालुक्यातील ३, चंदगड तालुक्यातील ५, गडहिंग्लज तालुक्यातील १०, हातकणंगले तालुक्यातील ३, कागल तालुक्यातील ६, करवीर तालुक्यातील ७, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा ६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कागल तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ५५१ असून ४६, १७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत १६५७ जणांचा मृत्यू झाला असून ७१५ जणांवर उपचार सुरू आहेत.