कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ६८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९१० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १६, आजरा तालुक्यातील २, भुदरगड तालुक्यातील ३, चंदगड तालुक्यातील ५,  गडहिंग्लज तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील ६, कागल तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील ६, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ३, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण ६८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७, ९६१ झाली असून आतापर्यंत ४५, २८७ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३७ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १०३७ जणांवर उपचार सुरू आहेत.