कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज, तर दोघांचा मृत्यू

0
51

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी पाचपासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ पर्यंतच्या चोवीस तासात ५५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच ८५६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोल्हापूर शहरातील १६, चंदगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १५, करवीर तालुक्यातील ६, पन्हाळा तालुक्यातील ४, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील ५, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर कागल तालुक्यातील मुरगूड येथील १ आणि करवीर तालुक्यातील कळंबा तर्फ ठाणे येथील १ अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आजअखेर कोरोना रुग्णांची संख्या ४८, ०१६ झाली असून ४५, ३५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६३९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत तर १, ०२५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.