कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २९९९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ६, चंदगड तालुक्यातील २हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील १ आणि कबनूर येथील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,९५०.

एकूण डिस्चार्ज : ४६,७५२.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ५२५.

एकूण मृत्यू : १६७३.