Published November 13, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ११, चंदगड तालुक्यातील १,  गडहिंग्लज तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ४ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गडहिंग्लज तालुक्यातील १ आणि करवीर तालुक्यातील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,६६४.

एकूण डिस्चार्ज : ४६.३४८.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ६५४.

एकूण मृत्यू : १६६२

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023