कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत २२ जणांना लागण…

0
55

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ७८६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील १३, चंदगड तालुक्यातील १,गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०, ०७८, आजअखेर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – ४८,२१५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३४, मृत्यू – १७२९.