कोरोना अपडेट : चोवीस तासांत २२ जणांना लागण

0
193

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात २२ जणांना लागण झाली आहे. तर ८५० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ७, गडहिंग्लज तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ व इतर जिल्ह्यातील ८ अशा २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,५६३, डिस्चार्ज – ४७, ८०४, उपचारासाठी दाखल रुग्ण – ५०, मृत्यू – १७०९.