कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत १५ जणांना लागण, तर दोघांचा मृत्यू

0
162

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २१ जण बरे झाले आहेत. ३०८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर ४, हातकणंगले, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील प्रत्येकी १, करवीर तालुक्यातील २, पन्हाळा तालुक्यातील ४ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला.

एकूण रुग्णांची संख्या – ४९, ५०६, आतापर्यंत डिस्चार्ज – ४७, ७४०, आजअखेरचे मृत्यू – १७०३. उपचारासाठी दाखल – ६३.