कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत १४ जण पॉझिटिव्ह

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात आज (रविवार) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ६९५ प्राप्त अहवालापैकी ६७३ अहवाल निगेटिव्ह आले. तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. १७ अहवाल नाकारण्यात आले. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ३६ प्राप्त अहवालापैकी ३५ अहवाल निगेटिव्ह तर १ अहवाल पॉझिाटिव्ह आला. खासगी रुग्णालये आणि लॅबमधून १०६ प्राप्त अहवालापैकी ९८ निगेटिव्ह तर ८ पॉझीटिव्ह असे एकूण १४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार ९९ पॉझिटिव्हपैकी ४८ हजार २२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण १४१ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. १४ पॉझिटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज २, हातकणंगले १, शाहूवाडी १, नगरपरिषद क्षेत्र २ कोल्हापूर महापालिका क्षेत्र ८, इतर जिल्हा व राज्यातील २ असा समावेश आहे.