कोरोना अपडेट : जिल्ह्यात दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज

0
99

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात ९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १००३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील ८, शाहूवाडी तालुक्यातील १, अशा ९ जणांना लागण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०, १०८, आजअखेर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – ४८,२४३, उपचारासाठी दाखल रुग्ण – १३५,  मृत्यू – १७३०.