कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ११ जणांना डिस्चार्ज

0
167

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ११ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४३४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर ५, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील प्रत्येकी १, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ अशा ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण रुग्णांची संख्या – ४९, ४९१, आतापर्यंत डिस्चार्ज – ४७, ७१९, आजअखेरचे मृत्यू – १७०१. उपचारासाठी दाखल – ७१.