कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, दिवसभरात १० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,५१३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २, करवीर तालुक्यातील ३ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ अशा ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,३९१.

एकूण डिस्चार्ज : ४७,६१४.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ८०.

एकूण मृत्यू : १,६९७.