कोल्हापूर जिल्ह्यात आज १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान, दिवसभरात १७ कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तसेच ३८९३ जरांचे कोरोनान अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज पॉझिटीव्ह आलेल्या अहवालामध्ये कोल्हापूर शहरातील ३, आजरा तालुक्यातील ३, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, पन्हाळा तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा १९ जणांचा समावेश आहे. तर करवीर तालुक्यातील साबळेवाडी येथील १ आणि राजस्थान येथील १ अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या एकूण ४९,०४०.

एकुण डिस्चार्ज ४६,९२८.

कोरोना उपचार घेणारे ४३४.

तर एकुण मृत्यू १६७८ झाले आहेत.