नृसिंहवाडी येथे गुरुमोल परिवारातर्फे कोरोना जनजागृती

0
42

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : गुरुमोल परिवारचे अध्यक्ष, ग्रामपंचायत आणि देवस्थानचे सदस्य अमोल विभूते- पुजारी यांच्या वतीने सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी ‘तीळ गूळ घ्या, आणि गोड बोला’, पण मास्कचा वापर करा, असे आवाहन करत मास्क वाटप करून जनजागृती करण्यात आली. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, सोशल डिस्टन्स ठेवावा आणि मास्कचा वापर करून कोरोनाला हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात आले.

श्री दतदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, दुकानदार, भाजी मार्केट येथे विना मास्क फिरणाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या पूनम जाधव, अनघा पुजारी, मंगल खोत, विद्या कांबळे, तानाजी निकम, शिवराज जाधव, गिरीश खोंबारे, गुरुदास खोचरे, अविनाश निकम, तुषार खोंबारे, अमित सुतार, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.