कोल्हापुरात पुढील महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस : जिल्हाधिकारी (व्हिडिओ)

0
770

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना पुढील महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. यामुळे संबंधितांनी आरोग्य प्रशासनाकडे लवकर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (गुरुवार) केले आहे.

कोरोना आजाराच्या महामारीवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस कधी येणार, याकडे जगभरातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विविध कंपन्यांची लस निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. काही देशात लस देण्यास सुरूवात झाली आहे. भारतातही आता लस देण्याची तयारी सुरू केली आहे. लस साठवण्यासाठी जिल्हानिहाय शीतगृह केंद्र पुरेशी प्रमाणात की नाही, याची माहिती घेतली जात आहे. कोल्हापूर जिल्हयातही पुढील महिन्यापासून लस देण्यात येणार आहे. पण पहिल्यांदा सरकारी, खासगी दवाखान्यातील डॉक्टर, आरोग्य सेवकांना ही लस दिली जाईल. लस घेण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर गतीने केले जात आहे. लस घेऊ इच्छिणाऱ्या डॉक्टारांनी तालुका आरोग्य अधिकारी आणि शहरात महानगरपालिका प्रशासनाकडे नाव नोंदणी करावी, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली आहे.