कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली. सर्व नियमांचे पालन करीत लसीकरण होते की नाही, याची पाहणी कसबा बावड्यातील सेवा रूग्णालयात जावून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाहणी केली. दरम्यान, प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात झाल्याने कोरोनाची भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रतीक्षा होती. आज प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात झाली. शहरातील सीपीआर, पंचगंगा हॉस्पिटल, सेवा रूग्णालयात लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर रिअॅक्सन येते का हे पाहण्यासाठी अर्धातास संबंधितास प्रतीक्षा कक्षात ठेवण्यात आले. अर्धा तासानंतर त्यांना घरी जावू दिले जात होते. घरी गेल्यानंतरही काही आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.