जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच :  ३७ जणांचा मृत्यू

0
795

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस एकूण १४९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १९५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४११, आजरा-७१, भुदरगड-५२, चंदगड-२७, गडहिंग्लज-५३, गगनबावडा-४, हातकणंगले-१४५, कागल-६९,  करवीर-२४०, पन्हाळा-१०८, राधानगरी-३६, शाहूवाडी-२१, शिरोळ-९२, नगरपरिषद क्षेत्र-१२०, इतर जिल्हा व राज्यातील-५० अशा १४९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, २८, २९२, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, १२, १८६, मृतांची संख्या – ४,०६६, उपचार सुरू असलेले रुग्ण – १२, ०४०