कोरोना लशीत डुकराची चरबी : मुस्लिम संघटनांचा मोठा निर्णय  

0
482

मुंबई  (प्रतिनिधी) : चीनमध्ये तयार होणारी कोरोना लस न घेण्याचा निर्णय ९ मुख्य मुस्लिम संघटनांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला  आहे. चीनमध्ये तयार झालेल्या लशीत डुकराच्या चरबीचा वापर केला आहे. डुक्कर हे मुसलमानासाठी अशुभ (हराम) आहे. त्यामुळे ही लस न घेण्याच्या  सूचना देण्यात आल्याची माहिती   रझा अकादमीचे सचिव मौलाना सय्यद नूरी यांनी दिली.

नूरी  म्हणाले की, या लसीमध्ये डुकराचे केस, चरबी आणि मांसाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. डुकराचा एक केस जरी विहिरीत पडला असेल, तर त्या विहिरीचे पाणी सेवन केले जात नाही. त्यामुळे चीनमधील कोरोना लसीचा वापर मुस्लिम समुदाय करणार नाही.  लसीमध्ये डुकराची चरबी, मांस आहे की नाही याची माहिती घेतली जाईल.  त्यानंतर इस्लामिक परिषदेकडून मंजुरी मिळाल्यानंतरच मुस्लिमांना कोरोना लस घेण्याच्या सुचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत मुस्लिम संयुक्त अरब अमिराततर्फे इस्लामिक परिषदेकडून एक फतवा काढला आहे. त्यानुसार मुंबईतील मुस्लिम संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. मानवी  जीवाला वाचवणे, ही आपली प्राथमिकता आहे, जर पर्याय नसेल तर इस्लामी बंधनापासून मुक्त ठेवण्यात येईल, असे इस्लामिक परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या यांनी सांगितले आहे.