मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गायिका, गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आज (मंगळवार) स्पष्ट झाले. त्यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यांचे ९२ वय आहे. वयाचा विचार करून खबरदारी म्हणून त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लतादीदींची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने  त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे सांगितले होते.