शिरोळ (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आता ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकासह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, खबरदारी म्हणून संबंधित शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक यांची  कोरोना तपासणी होण्याची शक्यता आहे. शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समजताच    शहरात एकच खळबळ माजली आहे.  तर कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे.