कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४३ जणांना कोरोनाची लागण

0
176

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (शुक्रवार) दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   १,५२२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, भूदरगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील ६, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,८१६.

डिस्चार्ज – ४८,७५६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३११.

मृत्यू – १७४९.