लोटेवाडीत २३ जणांना कोरोनाची लागण : गावात पूर्णपणे लॉकडाऊन

0
842

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी गावात कोरोनाने थैमान घातले असून  गावामध्ये एकूण २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका ३२ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील ग्रामपंचायतीने  संपूर्ण गाव लॉकडाऊन  करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोटेवाडी गावात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता गावातील  सर्वच दुकाने, गिरणी बंद करण्यात आली आहेत. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडांत्मक कारवाई केली जाणार आहे. तर प्रशासानच्या नियमांचे उल्लंघन करु नये अशा सूचना कोरोना दक्षता कमिटीने दिल्या आहेत.