जिल्ह्यात २० जणांना कोरोनाची लागण…

0
62

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ८७९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना पाझिटीव्ह रुग्ण – ४९,७३३.

डिस्चार्ज – ४७,९४१.

उपचारासाठी दाखल रुग्ण  – ८०.

 मृत्यू – १७१२.