जिल्ह्यात ११ जणांना कोरोनाची लागण…

0
131

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात ५ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तर गेल्या चोवीस तासात ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ८७१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील ७, हातकणंगले तालुक्यातील १ आणि कागल तालुक्यातील ३ अशा अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,७६८.

डिस्चार्ज – ४७,९६१.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ९५.

मृत्यू – १७१२.