नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पण या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यांना घरातच स्थानबध्द करण्यात आले आहे. दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे.

कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी पवार मध्यस्थी करणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला कांदा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. यावर आता पवार तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.