वादग्रस्त मंत्री राठोड माध्यमांसमोर, काय म्हणाले ?

0
467

वाशिम (प्रतिनिधी): राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. पंधरा दिवसांनी माध्यमांसमोर त्यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, पुण्यात पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुखी आहे. या प्रकरणात घाणेरडे राजकारण केले जात आहे. पूजा चव्हाण आमच्या समाजातल्या मुलीचा मृत्यू झाला. याचे आम्हाला दु:ख आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या.
मंत्री राठोड म्हणाले, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचे बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडे राजकारण केले जाते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. या प्रकरणावरुन गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझी बदनामी करु नका. माझ्या पत्नीला रक्तदाबाचा त्रास, मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा. सोशल मीडियावर फोटो आपण सर्वजण पाहता. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली ३० वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे. एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका.