कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या विविध पदांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या शिवसैनिकांसाठी उद्या शनिवार, दि.१६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिवालय, शिवसेना शहर कार्यालय येथे संपर्क अभियान आयोजित केले असून, इच्छुक शिवसैनिकांनी शिवालय शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही काम करत असून, जिल्हा पातळीवर शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तर शहर पातळीवर शहरप्रमुख, महिला आघाडी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.