कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यातील बांधकाम कामगार आणि आशा वर्कर गटप्रवर्तक यांनी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दस्तुर चौक, कळे येथे आपल्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केले.

यावेळी कामगारांना गुलाम बनविणाऱ्या कामगार संहिता रद्द करा, शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणारे कायदे रद्द करा, बांधकाम कामगारांची मेडीक्लेम योजना सुरू करा, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा, व आशा, गटप्रवर्तक यांना सेवेत कायम करा, बांधकाम कामगारांना घरासाठी १० लाख अनुदान द्या, पूरग्रस्त काळात सर्व्हे केलेले मानधन आशांना मिळावे, नॅपकीनची विक्री करण्याची सक्ती करु नये, गट प्रवर्तकांना लॅपटॉप मिळावेत देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच या मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

यावेळी पन्हाळा अध्यक्ष भगवानराव घोरपडे, शाहुवाडी अध्यक्ष आनंदा मगदूम, मनोहर सुतार, राजू खांबे, उदय निकम, संजय सुतार,  सागर भोसले, पिंटू कांबळे संजय जाधव, संजय रावण आणि आशा वर्कर संघटनेच्या स्मिता कुलकर्णी, सुरेखा तिसंगीकर, विमल अतिग्रे, राणी यादव, कोमल पाटील, आशा वर्कर उपस्थित होत्या.