कोल्हापूर (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) करवीर तालुका जनसंपर्क कार्यालयामध्ये आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थी शाहू पंडित कांबळे याने संविधानाचे वाचन केले आणि संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला पश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाचे मूल्य रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.

यावेळी करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, रणजित कांबळे, गोपाळ कांबळे, बिरदेव पाणीपुरवठा संचालक दत्तात्रय कांबळे, वासुदेव विकास सेवा संस्थेेचे संचालक कृष्णात कांबळे, प्रा. दत्तात्रय कांबळे,  शहाजी कांबळे, पंडित कांबळे, शुभम वाशीकर, नामदेव कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनील दोनवडेकर, सुभाष कांबळे, शहाजी कांबळे आधी समाजातील बांधव उपस्थित होते.