‘मनोरा’ हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान : हॉटेल व्यवस्थापन

0
1677

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (रविवार) मनोरा हॉटेल येथे जेवणामध्ये पाल सापडल्याचे सांगत काही तरुणांनी हॉटेलमध्ये हुज्जत घातली होती. यावर मनोरा हॉटेलच्या व्यवस्थापनाने आमच्या हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याच्या बहाणा करुन कांगावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यामुळे विनाकारण आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचे सांगितले.

तसेच गेली दहा वर्षे आम्ही कोल्हापूरकरांना सेवा देत आहोत. पण आजवर कधीच आमच्याबद्दल तक्रार आलेली नाही. किंबहुना कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळेच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि दिवसेंदवस तो वाढतच आहे. काल घडलेली घटना अतिशय वाईट असून आमच्या हॉटेलला बदनाम करण्याच्या दृष्टीने यामध्ये काहीजण प्रयत्न करीत आहेत, हे उघड आहे. कारण याचा प्रत्यक्ष सीसीटीव्हीमधील रेकॉर्ड झालेल्याचा पुरावा आम्ही सर्वांसमोर देत आहोत.

जर पाल सापडलीच असती तर त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. पण त्याऐवजी त्यांनी ‘व्हिडीओ काढा, शूटिंग करा’ असा कांगावा आणि गोंधळ सुरू केला. याच्यावरून सहजपणे लक्षात यायला हवे की यांनी पूर्वनियोजितपणे ठरवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा घडलेला प्रकार निंदनीय असून आम्ही या गोष्टीचा निषेध करीत असल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापनाने सांगितले.