आंदोलनात चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट उघडकीस : एकाला अटक

0
205

मुंबई (प्रतिनिधी) : कृषी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात घातपात घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे. दिल्लीत चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट उधळला गेला आहे. आंदोलनस्थळी आरोपीला अटक करण्यात आली आहे.  प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. यावेळी एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा  प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे. काल (शुक्रवार) रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभे केले. त्यानंतर या व्यक्तीने चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असे सांगितले.  ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता, अशी कबूली त्याने दिली आहे.