मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलाचे चटके अजूनही ग्राहकांना बसत आहेत. त्यावरून राज्यात वादळही निर्माण झाले होते. आता या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल, असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. दिवाळी आधी निर्णय होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. वित्त विभागात फाईल गेली आहे. अर्थमंत्री अजित पवार कोरोनाग्रस्त असल्यामुळे, त्यामुळे ते आले की निर्णय होईल. पण दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे संकेतही राऊत यांनी दिले.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना वीजेची अव्वाच्या सव्वा बिले आली होती. त्यावरून असंख्य तक्रारी केल्या गेल्या. राजकीय पक्षांनीही आवाज उठवला होता. ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, १२ ऑक्टोबरला मुंबई अंधारात गेली. त्याची नेमकी कारणे काय याविषयी माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे.