शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर काँग्रेसची प्रतिक्रिया

0
179

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबादमधील भेटीच्या वृत्तानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आता यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दामून हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत आहेत, असे सांगितले. त्यांना भेटायचं असतं तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही. विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं, असेही ते म्हणाले.