गडहिंग्लज येथे केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची धरणे

0
39

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाला हेतुपुरस्सर बदनाम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत ईडीच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा लावल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे यांनी भाजपच्या दडपशाहीवर जोरदार हल्ला केला. सोमगोंडा आरबोळे, प्रा. आझाद पटेल, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. या धरणे आंदोलनात अॅड. दिग्विजय कुराडे, राजशेखर येरटे, अजित बंदी, तमन्ना पाटील, फत्तेसिंह नलवडे, महेश तुरबतमठ, दयानंद पट्टणकुडी, संतोष चौगुले, प्रा. तानाजी चौगुले, प्रा. विक्रम शिंदे, प्रा. बिनादेवी कुराडे, जे. वाय. बारदेस्कर, हारूण सय्यद, जयसिंग चव्हाण, विश्वजित कुराडे, प्रा. स्मिता पाटील, प्रा. श्रद्धा पाटील, प्रा. बेलेकर, रामदास पाटील, उत्तम नाईक, अॅड. भास्कर पाटील, युवक अध्यक्ष अक्षय पाटील, नारायण पाटील, अभिजित भाटले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.