इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेस आमदारांची सायकल रॅली (व्हिडिओ)

0
182

मुंबई (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईत आज (सोमवार) सायकल रॅली काढली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीत काँग्रेसचे मंत्री व आमदारांनी सहभाग घेतला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमगार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.

 

काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सायकलवरुन विधानभवनाकडे रवाना झाले. यावेळी इंधन दरवाढीवरुन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. दरम्यान काँग्रेस आमदारांची सायकल रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.