मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (गुरूवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याकडे राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेण्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपनेही या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे थोरात आणि पटोले यांनी फडणवीस यांच्याकडे निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर काँगेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेण्यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केल्याची चर्चा   चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपसमोर लोटांगण घातले, असे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने म्हटल्याचे समजते.