काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

0
6

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस (वय ८०) यांचे आज (सोमवार) मंगळुरूमध्ये निधन झाले. त्याच्यावर  रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

जुलैमध्ये योगा करताना पडल्यामुळे डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूमध्ये रक्त जमा झाल्याने त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यूपीए सरकारमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री होते. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणूनही काम पाहिले होते. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तर लोकसभेवर पाच वेळा ते निवडून गेले होते.