काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

0
82

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री मोतीलाल वोरा (वय ९३) यांचे आज (सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल केले होते. अखेर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मोतीलाल वोरा अनेक वर्षे काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदी नेत्यांनी मोतीलाल वोरा यांच्या निधानाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.