काँग्रेस नेता बरळला, ‘मदरसे नकोत,  मग कुंभमेळाही नको !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम सरकारने मदरशांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. हा निर्णय घेताय तर मग कुंभमेळ्यांवरदेखील ४२०० कोटी खर्च करू नयेत, असे ट्वीट त्यांनी केले. या विधानावर सर्व थरातून टीका होताच त्यांनी हे ट्वीट डिलीट केले.

यापुढे सरकारी पैशावर मदरसे चालू देणार नाही, ते जनतेचे पैसे आहेत. या पैशाचा उपयोग कोणत्यातरी एकाच धर्माच्या शिक्षणासाठी देता येणार नाही, अशी भूमिका आसाम सरकारने स्पष्ट केली असून त्यांचे अनुदान बंद करण्यात आल्याची घोषणा  केली. यावरून काँग्रेसचे नेते उदित राज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जर आसाम सरकार सरकारी पैशांनी मदरसे न चालवण्याचा निर्णय घेत असेल, तर मग कुंभमेळ्यांच्या आयोजनावर देखील सरकारने ४ हजार २०० कोटी रुपये खर्च करता कामा नये,  असे ट्वीट त्यांनी केले. मात्र, यावरून वाद वाढत गेल्याने त्यांनी आपले ट्विट डिलीट केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी जोरदार हल्ला चढवला. मित्रांनो, हे आहे गांधी कुटुंबाचे सत्य, असे म्हणत पात्रा यांनी खरमरीत टीका केली.

Live Marathi News

Recent Posts

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होणार मुख्यमंत्री..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे राज्यपाल…

58 mins ago

अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील महाविकास आघाडी…

3 hours ago

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

16 hours ago