काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन

0
45

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल (वय ७१) यांचे आज (बुधवारी) पहाटे ३.३० वाजता निधन झाले. पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर एक महिन्यांपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

पटेल यांच्या शरीराच्या अनेक अवयव निकामी झाले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून कोरोना नियमांचे पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचे पालन करा, असे ट्विट पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी  केले आहे.