काँग्रेसतर्फे कोल्हापुरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

0
21

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संकटकाळात काँग्रेस पक्ष नेहमीच सामान्यांच्या मदतीसाठी अग्रेसर असतो. यापुढेही सामान्यांना दिलासा देण्याचे काम असेच सुरू राहील अशी ग्वाही प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी दिली. त्या आज (शनिवार) पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाप्रसंगी बोलत होत्या.

पंचगंगा नदीकाठावरील अनेक गावांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना मदत म्हणून संध्याताई सव्वालाखे यांच्या हस्ते, आ. पी. एन. पाटील आणि शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात करण्यात आले.

या वेळी संगीता तिवारी, उज्वला साळवे, सरलाताई पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, चंदा बेलेकर, अपर्णा पाटील, उदयानी साळोखे, गुलाबराव घोरपडे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, जिल्हा सचिव संजय पवार-वाईकर यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.