काँग्रेस कमिटीत राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

0
23

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची ७७ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत साजरी करण्यात आली. ना सतेज पाटील यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगाऺवकर, जि.प. अध्यक्ष राहुल पाटील,  महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, जय पटकारे, जिल्हा महिला अध्यक्ष सुप्रिया साळोखे, शहर महिला अध्यक्ष संध्या घोटणे, अॅड. गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित होते.