मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस आमदारांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. तर भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली . त्याआधी  सभागगृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले.

यावेळी काँग्रेस आमदारांनी मोदी सरकाविरोधात घोषणा दिल्या. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस नेत्यांकडून इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती.  त्याआधी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.  यावेळी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,  केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्दतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे. त्यामधून सर्वसामान्यांचे जगणं मुश्कील झाले आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे दरवाढ  झाल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न सुरु आहे.  लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचे काम सुरु आहे, त्यास आमचा विरोध आहे.