‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ : सभा थांबविण्याची विरोधकांची मागणी

0
385

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघाच्या पशुखाद्य कार्यालयाच्या आवारात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा थांबविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे प्रकृतीच्या कारणास्तव सभेला गैरहजर असल्यामुळेत्यांनी आपले भाषण पाठवले होते. ते यावेळी दाखविण्यात आले.