कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या तीन वर्षांपासून महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व जोरदार पावसाच्या सरींनी बळीराजांनी आनंदाने पेरणी करून घेतली होती. त्यानंतर हुकमी असा पाऊस पडलाच नसल्याने चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वांचेच पावसाकडे डोळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून महापूर पाहणाऱ्या नद्याही पावसाची वाट पाहू लागल्या आहेत. आतापर्यंत (१५ जून) गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३६ टक्के पाऊस कमी झाला आहे.

राधानगरी (भोगावती) .३६ टीएमसी : मागील वर्षी १५ जून रोजी- १.६० टीएमसी (१९ टक्के), मागील २४ तासांतील पाऊस- ० एमएम, १ जूनपासून आजपर्यंत पाऊस- २२  एमएम, गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-१०६ एमएम.

काळम्मावाडी (दूधगंगा) २५.३९ टीएमसी: मागील वर्षी १५ रोजी- ६.०६ टीएमसी (२३ टक्के), मागील २४  तासातील पाऊस-३ एमएम, १ जूनपासून आजपर्यंत पाऊस- ३९ एमएम, पाटगाव (वेदगंगा) .७१ टीएमसी  : मागील वर्षी १५ रोजी- १.०९ टीएमसी (२९ टक्के), आज रोजी- १.११ टीएमसी (३० टक्के), मागील २४ तासांतील पाऊस-१४ एमएम, आजपर्यंत पाऊस-१५५ एमएम. चिकोत्रा (चिकोत्रा) .५२ टीएमसी : मागील वर्षी १५ जूनची स्थिती- ०.५२ टीएमसी (३४ टक्के) आजचा रोजी- ०.७४ टीएमसी (४८ टक्के), १ जूनपासून आजपर्यंत पाऊस-२६ एमएम.