गगनबावडा तालुक्यात कोवीड लसीकरणास प्रारंभ

0
172

बोरपाडळे (प्रतिनिधी)  :  गगनबावडा तालुक्यातील   गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय  अधिकारी डॉ. अजय गवळी यांना डॉ. फारूख देसाई यांच्या  हस्ते पहिली कोवीड लस देण्यात आली.  जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील  यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी,  तहसीलदार संगमेश कोडे, गटविकास अधिकारी शरद भोसले,   सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले,  अधीक्षक डॉ. सरिता थोरात  उपस्थित होते.

गगनबावडा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,  अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा, स्वंयसेविका  महसूल व पंचायत समिती कर्मचारी  आदींचा समावेश असलेल्या २८१ जणांना ही लस देण्यात येणार आहे. उर्वरित लोकांना  टप्याटप्याने  लस देण्यात येणार आहे. यावेळी  लस घेणाऱ्यांना २८ दिवसांनंतर पुढील डोस देण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. विशाल चोकाककर यांनी दिली.

यावेळी माजी सभापती मंगल कांबळे, सदस्य आनंदा पाटील, सुहास घाटगे,  डॉ. पंकज दाते,  डॉ.विशाल पाटील, डॉ. रूपाली चिचंणेकर, विस्तार अधिकारी विजय सांवत,   अर्जुन इंगळे, नियाज शेख,  लक्ष्मीदास दुधवाडकर, गणपत पडवळ,  आनंद काळे,  अंकुश तेलगंण, सुनील ठोबरे,  कार्तिक सातपुते,  आशा समन्वयक उत्तम पाटील,  गटप्रवर्तक हेमा कांबळे,  मनिषा जोंधळेकर, यासीन म्हालदार,   आय.व्ही. पुजारी आदी उपस्थित होते.